सेंद्रिय अच्छादनाचे फायदे...

सेंद्रिय अच्छादनाचे फायदे...


वृक्ष लागवड फळबाग लागवड पिकांची लागवड मध्ये अच्छादन करणे खुप महत्वाचे आहे. कारण की वृक्षांची, पिकांची लागवड करने इतकेच त्यांची जोपासना करने, त्यांना पाणी देने, अच्छादन करणे हि कामे केली तरच केलेल्या मेहनतीचे फळ चांगल्या पद्धतीने मिळनार आहे.


अच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थ :- 1) पिकांचे अवशेष 2) बि विरहीत गवत 3) झाडांची पाने (प्रामुख्याने गिरीपुष्प, करंज).

अच्छादनाची पद्धत :- 1) झाडांनसाठी :- दुपारच्या सावलीच्या भागामध्ये झाडाच्या बुडा  पासुन 1 फुट अंतर ठेवुन अच्छादन करावे.
2) पिकांनसाठी :- दोन ओळीतील आतील जागे मध्ये अच्छादन करावे.


अच्छादनाचे फायदे :-
1) अच्छादनामुळे सुर्य प्रकाशाचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळे जमिनीतील ओल टिकुन राहते. तसेच पाणी देण्याच्या वेळा व पाण्याची बचत होते.
2) तणांचे प्रमाण खुप कमी होते त्यामुळे तण नियंञणावरील खर्च कमी होतो.
3) अच्छादनासाठी वापरलेले सेंद्रीय पदार्थ कुजल्याने त्याचे खत झाडांना मिळते त्यामुळे खतांचा खर्च कमी होतो.
4) जमिनीची सुपिकता वाढते, परिणामी जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
5) अच्छादनामुळे तयार झालेल्या खतातील ह्युमस पिकाला मिळाल्यामुळे वाढ चांगली जोमदार होते. त्यामुळे झाडांना मुळावाढवण्याचे ह्युमिक अँसीड देण्याची गरज नाही.
6) फळांच्या संख्येत व क्वॉलिटी मध्ये सुधारणा होते.
7) जमिनीमध्ये गांडुळे व सुक्ष्म जिवजंतुची वाढ होते.
8) पाणी टंचाई मुळे होणारी झाडांची मर वाचवता येते.
9) जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मा मध्ये सुधारणा होते.
10) जमिनीमध्ये अगोदर व आत्ता टाकलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
 प्लास्टिक मल्चींग मुळे वरील प्रमाणे महत्वाचे फायदे होत नाहीत. त्यामुळे सेंद्रीय पदार्थ चे अच्छादन करावे.
            

Comments

Popular posts from this blog

🌲🌳शेती व आरोग्य सल्ला ग्रुप समुह🌳🌲

सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन