सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन

सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन

         
            सोयाबीन हे खरिप हंगामातील तेलवर्गीय पिकातील जगात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाणारे पिक आहे. या पिकाचा कालावधी ८० ते ११० दिवस असल्याने पेरणी करताना आणी पेरणी नंतर देखील योग्य खत व्यवस्थापन करने अत्यंत गरजेचे आहे.

 सोयाबीन पेरणी करतानाचे खत व्यवस्थापन :- सोयाबीन ला पेरणी करताना कृषि विद्यापीठ शिफारशी नुसार हेक्टरी ३० किलो नञ, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश. या खत माञेचे जमिनीचे माती परिक्षण करून काटेखोर खत व्यवस्थापन करने गरजेचे आहे.
सोयाबीन पिकाला नञ, पालाश कमी प्रमाणात तर स्फुरद जास्त प्रमाणात लागते म्हणून पेरणी करताना १२:३२:१६ खत पेरणे योग्य आहे.  तसेच सोयाबीन ला एकरी १० किलो बेनसल्फ म्हणजे गंधक पेरणे गरजेचे आहे.

महत्वाची तिन कारणे :- बियाणे दर्जा सुधारतो, बियामधील तेलाचे प्रमाण वाढते, वजनामध्ये चांगली वाढ होते.

सोयाबीन पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन :-
१) सोयाबीन पेरणी नंतर २१ दिवसाच्या जवळ पास पाण्यात विरघळणारे १९:१९:१९ खत २० ते २२ लिटर पेट्रोल पंपासाठी ७५ ते ८० ग्राम टाकुन फवारणी करावी. हे संतुलित खत असल्याने वाढ आणी फुटवे चांगले होतात.  तसेच १९:१९:१९ खत पावसाची उघाड पडल्यावर याच प्रमाणात फवारल्यास पिक १० ते १५ दिवस पाण्याचा तान सहन करते.
२) सोयाबीन पिक कळी व फुल अवस्थे मध्ये आल्यावर २% युरिया म्हणजे १०० लिटर पाण्यासाठी २ किलो युरिया आणि जास्तीत जास्त सुक्ष्म अन्नद्रव्य असलेल्या कंपनी चे मायक्रोनिव्हट्रीयंट उदा :- टाटा बहार, बायो २० (मंगला कंपनी) चे २० ते २२ लिटर पेट्रोल पंपासाठी ५० ते ६० मि. ली वापरावे. याला सेंद्रिय पर्याय म्हणून गांडुळ खताचे पाणी म्हणजे व्हर्मीवॉश २० ते २२ लिटर पंपासाठी १ ते १.५ लिटर वापरावे.

 फायदे :- पिक कळी व फुल अवस्थे मध्ये वरिल प्रमाणे फवारणी केल्यास फुलांची संख्या मध्ये चांगली वाढ होते.
याचा आचर्य कारक फायदा म्हणजे पिक फुल व शेंग अवस्थे मध्ये असताना किडींचा जास्त प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकरी बांधवांच्या सोयाबीन च्या शेंग्या उद्वस्त झाल्या होत्या. त्यावेळ याची फवारणी केल्यावर आणखीन फुल व शेंगा येऊन उत्पादन सरासरी प्रमाणे निघाले होते.
३) सोयाबीन पिक पुर्ण पणे शेंग अवस्थे मध्ये आल्यावर २० ते २२ लिटर पेट्रोल पंपासाठी ७५ ते ८० ग्राम ००:५२:३४ खत पाण्यात विरघळणारे फवारल्यास झाडाची पुर्ण पणे वाढ थांबुन शेंग्या मधील बि मोठे होण्यास मदत होते. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते...
    

Comments

Popular posts from this blog

🌲🌳शेती व आरोग्य सल्ला ग्रुप समुह🌳🌲

सेंद्रिय अच्छादनाचे फायदे...