Posts

Showing posts from November, 2018

सेंद्रिय अच्छादनाचे फायदे...

Image
सेंद्रिय अच्छादनाचे फायदे... वृक्ष लागवड फळबाग लागवड पिकांची लागवड मध्ये अच्छादन करणे खुप महत्वाचे आहे. कारण की वृक्षांची, पिकांची लागवड करने इतकेच त्यांची जोपासना करने, त्यांना पाणी देने, अच्छादन करणे हि कामे केली तरच केलेल्या मेहनतीचे फळ चांगल्या पद्धतीने मिळनार आहे. अच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थ :- 1) पिकांचे अवशेष 2) बि विरहीत गवत 3) झाडांची पाने (प्रामुख्याने गिरीपुष्प, करंज). अच्छादनाची पद्धत :- 1) झाडांनसाठी :- दुपारच्या सावलीच्या भागामध्ये झाडाच्या बुडा  पासुन 1 फुट अंतर ठेवुन अच्छादन करावे. 2) पिकांनसाठी :- दोन ओळीतील आतील जागे मध्ये अच्छादन करावे. अच्छादनाचे फायदे :- 1) अच्छादनामुळे सुर्य प्रकाशाचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळे जमिनीतील ओल टिकुन राहते. तसेच पाणी देण्याच्या वेळा व पाण्याची बचत होते. 2) तणांचे प्रमाण खुप कमी होते त्यामुळे तण नियंञणावरील खर्च कमी होतो. 3) अच्छादनासाठी वापरलेले सेंद्रीय पदार्थ कुजल्याने त्याचे खत झाडांना मिळते त्यामुळे खतांचा खर्च कमी होतो. 4) जमिनीची सुपिकता वाढते, परिणामी जमिनीची जलधारण क्षमता वाढते. 5) अच्छादनामु

सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन

सोयाबीन पेरणी करताना चे खत व्यवस्थापन व पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन                       सोयाबीन हे खरिप हंगामातील तेलवर्गीय पिकातील जगात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाणारे पिक आहे. या पिकाचा कालावधी ८० ते ११० दिवस असल्याने पेरणी करताना आणी पेरणी नंतर देखील योग्य खत व्यवस्थापन करने अत्यंत गरजेचे आहे.  सोयाबीन पेरणी करतानाचे खत व्यवस्थापन :- सोयाबीन ला पेरणी करताना कृषि विद्यापीठ शिफारशी नुसार हेक्टरी ३० किलो नञ, ६० किलो स्फुरद, ३० किलो पालाश. या खत माञेचे जमिनीचे माती परिक्षण करून काटेखोर खत व्यवस्थापन करने गरजेचे आहे. सोयाबीन पिकाला नञ, पालाश कमी प्रमाणात तर स्फुरद जास्त प्रमाणात लागते म्हणून पेरणी करताना १२:३२:१६ खत पेरणे योग्य आहे.  तसेच सोयाबीन ला एकरी १० किलो बेनसल्फ म्हणजे गंधक पेरणे गरजेचे आहे. महत्वाची तिन कारणे :- बियाणे दर्जा सुधारतो, बियामधील तेलाचे प्रमाण वाढते, वजनामध्ये चांगली वाढ होते. सोयाबीन पेरणी नंतरचे खत व्यवस्थापन :- १) सोयाबीन पेरणी नंतर २१ दिवसाच्या जवळ पास पाण्यात विरघळणारे १९:१९:१९ खत २० ते २२ लिटर पेट्रोल पंपासाठी ७५ ते ८० ग्राम टाकुन फवारणी करावी.